सांगली -प्रत्येक महान पुरूषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असे नाही, अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना नाव न घेता मारली आहे. सांगलीच्या औदुंबर येथील ७८वे सदानंद साहित्य संमेलन प्रसंगी बोलत होते.
७८वे सदानंद साहित्य संमेलन संपन्न
सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या औदुंबर या ठिकाणी ७८ वे सदानंद साहित्य संमेलन पार पडले आहे. या संमेलनाला साताराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील हे उपस्थित होते. या संमेलनाचे अध्यक्षपद सांगलीतील प्राध्यापक वैजनाथ महाजन यांच्याकडे होते आणि संमेलनामध्ये महाजन पती-पत्नीचा सपत्निक सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर भाषण करताना खासदार श्रीनिवास पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच टोलेबाजी केली.
'उपस्थितांमध्ये हशा'
महाजन पती-पत्नीच्या सत्कारावर करण्यात आलेल्या टिप्पणीचा आधार घेत, खासदार पाटील म्हणाले, की कोणीतर म्हणाले प्रत्येक महान पुरूषामागे एक स्त्री उभी असते. पण ती पत्नीच असते असे नाही. गैरसमज करून घेऊ नका, असे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.