महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीच्या 'संभाजी'ने 'एव्हरेस्ट'वर फडकावला मुंबई पोलिसांचा झेंडा - सांगली संभाजी गुरव बातमी

मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करून तेथे मुंबई पोलीस दलाचा झेंडा फडकला आहे. गुरव हे वाळवा तालुक्यातील पडवळवाडीचे सुपुत्र आहेत.

sambhaji guraj becomes Everest Veer
सांगलीचा सुपुत्र बनला एव्हरेस्ट वीर वाचा

By

Published : May 24, 2021, 3:16 PM IST

Updated : May 24, 2021, 5:27 PM IST

सांगली -सांगलीचे सुपुत्र असणाऱ्या मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करून तेथे मुंबई पोलीस दलाचा झेंडा फडकला आहे. गुरव हे वाळवा तालुक्यातील पडवळवाडीचे सुपुत्र आहेत. त्यामुळे सांगलीच्या शिरपेचात गुरव यांच्या कामगिरीने मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मुंबई पोलिसांचा 'एव्हरेस्ट वीर' -

मुळचे पडळवळवाडीचे सुपुत्र असणारे संभाजी गुरव हे मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरव यांना पहिल्यापासून गिर्यारोहणाची आवड आहे. पोलीस दलात भरती होण्यापूर्वी त्यांनी गिर्यारोहनाचे धडे घेतले आहेत. पोलीस दलात भरती झाल्यानंतरही गुरव यांचा गिर्यारोहणाच्या बाबतीत श्रम सुरूच होते. एव्हरेस्टचा शिखर सर करण्याचे ध्येय बाळगून गुरव यांनी पोलीस दलात दाखल झाल्यानंतरही अथक प्रयत्न सुरूच ठेवले होते. यातूनच एव्हरेस्ट सर करण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक क्षमता तपासणीसाठी एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेनिंगदेखील पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांना एव्हरेस्ट शिखर खुणावत होते.

संभाजी गुरव

गिर्यारोहकांच्या यादीत सुवर्ण अक्षराने नोंद -

14 मे पासून संभाजी गुरव यांनी काठमांडू येथून एव्हरेस्ट शिखर सर करण्याची मोहीम सुरु केली. 65 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत 17 मे रोजी बेस कॅम्प 2 याठिकाणी पोहचले. त्यानंतर 18 मे रोजी बेस कॅम्प 3, 19 मे रोजी बेस कॅम्प 4 आणि त्यानंतर 20 मे पासून प्रत्यक्ष एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी चढाई सुरू झाली. निसर्गाची साथ आणि पोषक वातावरण यामुळे संभाजी गुरूव यांनी 22 मे रोजी अखेर एव्हरेस्ट शिखर सर करत महाराष्ट्र व मुंबई पोलीस दलाचा झेंडा फडकवला. मुंबई पोलीस दलाबरोबर सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हा सर्व प्रवास त्यांनी उणे 19 अंश सेल्सिअस तापमानाच्या वातावरणात पूर्ण केला. यापूर्वी महाराष्ट्रात पोलीस दलातील आयपीएस सुहेल शर्मा आणि औरंगाबादचे पोलीस कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याची नोंद आहे. यामध्ये आता संभाजी गुरव यांची देखील गिर्यारोहकांच्या यादीत सुवर्ण अक्षरांना नोंद झाली आहे.

हेही वाचा - म्यूकरमायकोसिस! ऐका... रुग्णांचे डोळे काढणाऱ्या डॉक्टरांचे अनुभव अन् सल्ले

Last Updated : May 24, 2021, 5:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details