महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत युवक काँग्रेसकडून सायकल रॅली काढत इंधन दरवाढीचा निषेध - sangli youth congress

इंधन दरवाढीसाठी केंद्राची धोरणे कारणीभूत असून यामुळे आता जनतेला सायकलवरून प्रवास करण्याची वेळ आली आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध
सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध

By

Published : Mar 29, 2021, 3:32 PM IST

सांगली : इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढून सांगलीत युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. वाढलेल्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप करत युवक कॉंग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले.

इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची सायकल रॅली
इंधन दरवाढीवरून केंद्रावर टीकागेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. पेट्रोल जवळपास शंभरीपर्यंत पोहोचले आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. इंधन दरवाढीसाठी केंद्राची धोरणे कारणीभूत असून यामुळे आता जनतेला सायकलवरून प्रवास करण्याची वेळ आली आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. युवक काँग्रेसचे नेते जितेश कदम आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही सायकल रॅली काढण्यात आली. शहरातल्या काँग्रेस कमिटी कार्यालयासमोरून या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून ही रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. केंद्राने इंधन दरवाढ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची भूमिका घ्यावी. अन्यथा पुढील काळात केंद्र सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details