महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापुरानंतर सांगलीची एसटी सेवा पूर्ववत; आगाराला 3 कोटींचा फटका

आठ दिवस पाण्यात असणारे बसस्थानक बुधवारी पुन्हा पूर्ववत झाले आहे. या महापुरात सांगली एसटी विभागाला जवळपास 3 कोटींचा फटका बसला आहे. पूराचे पाणी ओसरल्यामुळे ही एसटी सेवा पुन्हा सुरू झाली आहे.

महापुरानंतर सांगलीची एसटी सेवा पूर्ववत

By

Published : Aug 14, 2019, 10:29 PM IST

सांगली - महापुराचे पाणी ओसरल्यानंतर सांगलीची एसटी सेवा पूर्ववत झाली आहे. कृष्णा नदीला आलेल्या महापुरात सांगलीचे एसटी बसस्थानकही बुडाले होते. आठ दिवस पाण्यात असणारे बसस्थानक बुधवारी पुन्हा पूर्ववत झाले आहे. दरम्यान या महापुरामुळे सांगली एसटी आगाराला सुमारे ३ कोटींचा फटका बसला आहे.

महापुरानंतर सांगलीची एसटी सेवा पूर्ववत

सांगली आगाराची एसटी सेवा सर्व मार्गावर पुन्हा धावू लागली आहे. मात्र, या महापुरात सांगली एसटी विभागाला जवळपास 3 कोटींचा फटका बसला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याची कल्पना येताच याठिकाणी असणाऱ्या एसटी बस वेळेत मिरज आगारात हलविण्यात आल्या होत्या. त्यामुळे बस गाड्यांचे मोठे नुकसान टळले आहे. मात्र, सांगली एसटी आगाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. रोजच्या जवळपास 1 हजार फेऱ्या गेल्या आठ दिवस बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांचेही हाल झाले आहेत. शिवाय उत्पन्न ही बुडाले आहे. पूराचे पाणी ओसरल्यामुळे ही एसटी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. याबाबत सांगली एसटी विभागाच्या प्रमुख अमृता ताम्हणकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनी बातचीत केली.

ABOUT THE AUTHOR

...view details