सांगली -महापालिका आयुक्तांवर शिवसेनेच्या वतीने भ्रष्टाचार आणि गौरव्यवाहाराचा आरोप करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांची चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी सांगली जिल्हा शिवसेनेच्यावतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे आणि सांगली जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
नगरविकास मंत्र्यांना शिवसेनेचे निवेदन काय आहेत आरोप?
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्यावर जिल्हा शिवसेनेच्यावतीने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापूर आणि कोरोना काळात लखोंची उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे. सांगलीत आलेल्या महापुरात अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी भोजनासह अन्यधान्य व जीवानावश्यक वस्तुंची मदत केली होती. तरीही प्रति व्यक्ती तीनशे ते साडेतीनशे रुपये भोजनाचे बिल दाखवण्यात आले. यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला. तसेच कोरोना महामारीमध्ये देखील शासन आर्थिक अडचणीमध्ये असताना, कंटेंमेंट झोनच्या नावाखाली पत्रे ठोकून सुमारे 1 कोटी 41 लाखांचे बील आदा केले, असा आरोप शिवसेनेच्या वतीने आयुक्तांवर करण्यात आला आहे. तसेच आयुक्तांनी निवासस्थानाच्या नुतनीकरणासाठीही लाखोंची उधळपट्टी केल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांची चौकशी करावी, अशी भागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आपण एकनाथ शिंदे यांना पुराव्यासह निवेदन दिल्याचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सांगितले.
हेही वाचा -विरोधकांच्या भीतीमुळे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे - चंद्रकांत पाटील