सांगली: रस्त्यांच्या दुरावस्थे (Sangli Road Movement) विरोधात शालेय विद्यार्थ्यांनी आंदोलन (Movement of school students) केले आहे. मिरजेत रस्त्यावर उतरा शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः मुरूम टाकून खड्डे बुजवत, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या एका गटाकडून या आंदोलनासाठी पुढाकार घेण्यात आला होता. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला घराचा आहेर मिळाला आहे.
Sangli Road Movement: रस्त्यातील खड्यांच्या विरोधात शालेय विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन... - शालेय विद्यार्थ्यांचे आंदोलन
सांगली येथे (Sangli Road Movement) रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधात शालेय विद्यार्थ्यांनी आंदोलन (Movement of school students) केले आहे. मिरजेत रस्त्यावर उतरा शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः मुरूम टाकून खड्डे बुजवत, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या एका गटाकडून या आंदोलनासाठी पुढाकार घेण्यात आला होता. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला घराचा आहेर मिळाला आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. मिरज शहरातल्या तर रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत.पावसामुळे आता खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक,पादचारी यांनी त्याचा मोठा फटका बसत आहे. शहरातल्या अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थी हे पडून जखमी होत आहेत. मात्र स्थानिक नगरसेवक आणि सांगली महापालिका प्रशासनाकडून या खड्ड्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शालेय विद्यार्थ्यांनी थेट महापालिका प्रशासनाला जागेसाठी रस्त्यावर उतरत अनोखे आंदोलन केले आहे. शहरातील लक्ष्मी मार्केट या ठिकाणी असणारे खड्डे भाजपाचे नेते ओंकार शुक्ल आणि लोक अभियान मंचच्या माध्यमातून बुजवण्यात आले आहेत. यावेळी लहान मुलांनी हातात खोरे-पाट्या घेऊन मुरूम टाकण्यासाठी श्रमदान केलं. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन हात मोडलेल्या विद्यार्थ्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेत महापालिका प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता चिमुकल्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे नगरसेवक व महापालिका प्रशासनाला जाग येऊन रस्त्यांची दुरूस्ती होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.