सांगली- जिल्ह्याच्या दुष्काळी भागात गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस कोसळला आहे. कवठेमहांकाळ, आटपाडी आणि तासगाव तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊसाची नोंद झाली आहे. १७५ मिलीमीटर इतका पाऊस या तीन तालुक्यात गेल्या २५ दिवसात झाला आहे. त्यामुळे राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद सांगलीत झाली आहे.
सांगली जिल्ह्यात राज्यातील सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद, बळीराजा सुखावला
राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस फक्त सांगली जिल्ह्यात झाल्याची नोंद झाली आहे. सांगलीच्या दुष्काळी कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी या तालुक्यात रविवारी आणि सोमवारी या दोन दिवसात जोरदार पाऊस पडला आहे.
सांगलीच्या दुष्काळी कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी या तालुक्यात रविवारी आणि सोमवारी या दोन दिवसात जोरदार पाऊस पडला आहे. या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या दुष्काळी ठिकाणी पंचवीस दिवसात सरासरी ७१ मिमी पाऊस पडत असतो. मात्र, गेल्या २५ दिवसांमध्ये आत्ता पर्यंत ७५.३ टक्के म्हणजे सरासरी १०७ टक्के पाऊस पडला आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार दुष्काळी आटपाडी तालुक्यात सरासरीच्या १५४ टक्के पाऊस झाला आहे. तर तासगाव तालुक्यात सरासरीच्या १४४ टक्के आणि कवठेमहंकाळ तालुक्यात सरासरीच्या १३९ टक्के पाऊस झाला आहे. जत तालुक्यात सरासरीच्या १३४ टक्के पाऊस झाला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. चांगल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आंनद पसरला आहे.