महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीकरांनो...आता घरपोच मिळणार अत्यावश्यक सेवा, पोलिसांचा स्तुत्य उपक्रम - घरपोच अत्यावश्यक सेवा सांगली

संचारबंदी काळात अत्यावश्यक सुविधा नागरिकांना मिळणार असल्याचे प्रशासनाकडून वारंवार जाहीर करण्यात आले आहे, तर सांगली महापालिका क्षेत्रात प्रशासनाने आता 18 भाजीपाला खरेदी-विक्री केंद्र सुरू केली आहेत. मात्र, तरीही नागरिकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ही गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी घरपोच अत्यावश्यक सेवा सुरू केली आहे.

sangli police  emergency services at home  corona update  corona maharashtra  कोरोना महाराष्ट्र  कोरोना अपडेट  घरपोच अत्यावश्यक सेवा सांगली  सांगली पोलीस हेल्पलाईन नंबर
सांगलीकरांनो...आता घरपोच मिळणार अत्यावश्यक सेवा, पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

By

Published : Mar 26, 2020, 8:57 AM IST

सांगली- कोरोना संचारबंदीत आता साांगली पालिका क्षेत्रातील नागरिकांना घरपोच अत्यावश्यक सेवा मिळणार आहेत. सांगली पोलिसांनी ही सेवा सुरू केली असून त्यासाठी हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना घरातून ऑर्डर दिल्यास गरजेच्या वस्तू त्यांना मिळणार आहेत.

सांगलीकरांनो...आता घरपोच मिळणार अत्यावश्यक सेवा, पोलिसांचा स्तुत्य उपक्रम
संचारबंदी काळात अत्यावश्यक सुविधा नागरिकांना मिळणार असल्याचे प्रशासनाकडून वारंवार जाहीर करण्यात आले आहे, तर सांगली महापालिका क्षेत्रात प्रशासनाने आता 18 भाजीपाला खरेदी-विक्री केंद्र सुरू केली आहेत. मात्र, तरीही नागरिकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ही गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी घरपोच अत्यावश्यक सेवा सुरू केली आहे. यासाठी हेल्पलाइन नंबर सांगली पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत.
किराणामाल, भाजीपाला, औषध, दूध इत्यादी अत्यावश्यक सेवा घरपोच मिळणार आहेत. त्यामुळे सांगलीकरांनी अत्यावश्यक सेवेबाबत घाबरून न जाता निश्चिंत राहून दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या गरजेप्रमाणे वस्तू मागवाव्यात, असे आवाहन सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले आहे. ही सेवा पुरवण्यासाठी शहरातील दुकानदार यांची मदत घेण्यात येत असून प्रभागनिहाय त्या सेवा पुरवण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक शर्मा यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details