महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा ऑरेंज झोनमध्ये, सांगली पोलीस दलाने कोरोना वॉरिअर्सचे बँड वाजवून मानले आभार - sangli police news

कोरोनाचा सामना वॉरियर्स यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत मिरजेतील कोरोना रुग्णालयाच्या आवारात सांगली पोलीस दलाच्या बँडच्या वतीने कोरोना फायटर्सना मानवंदना देण्यात आली.

कोरोना वॉरिअर्सचे सांगली पोलीस दलाने बँड वाजवून मानले आभार
कोरोना वॉरिअर्सचे सांगली पोलीस दलाने बँड वाजवून मानले आभार

By

Published : May 3, 2020, 8:31 AM IST

Updated : May 3, 2020, 10:02 AM IST

सांगली - कोरोना विरोधात लढणाऱ्या मिरजेतील कोरोना रुग्णालयातील वॉरियर्सना सांगली पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली आहे. पोलीस बँड वाजवून कोरोना लढाईत प्रोत्साहन मिळावे आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम सांगली पोलीस दलाकडून राबवण्यात आला आहे.

सांगली पोलीस दलाने कोरोना वॉरिअर्सचे बँड वाजवून मानले आभार

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सध्याच्या घडीला ६ वर पोहचली आहे. आत्तापर्यंत ३३ कोरोना रुग्ण सांगली जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यापैकी २६ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये येथील डॉक्टर, पॅरामेडीकल फोर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अत्यंत काळजीपूर्वक उपचार करण्यात आले होते. मुंबईच्या जे.जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांचा या लढाईत विशेष सहभाग आहे. या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रेड झोनमध्ये गेलेला सांगली जिल्हा सध्या ऑरेंज झोनमध्ये आला आहे.

कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या वॉरियर्स यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत मिरजेतील कोरोना रुग्णालयाच्या आवारात सांगली पोलीस दलाच्या बँडच्या वतीने कोरोना फायटर्सना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी बँड वाजून मिरज कोरोना रुग्णालयातील डॉक्टर, सिव्हिल सर्जन, रुग्णालयातील स्टाफ अशा कोरोना वॉरिअर्सचे कौतुक केले.

जिल्हा प्रशासन आणि सांगली पोलीस दल यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सुरक्षित अंतर राहील याची खबरदारी घेण्यात आली होती. या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचीही उपस्थिती होती. आत्तापर्यंतच्या या लढाईत दिलेले योगदान आणि पुढच्या लढाईमध्ये त्यांना आणखी प्रोत्साहन मिळावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले आहे.

Last Updated : May 3, 2020, 10:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details