सांगली - कोरोनामुळे सांगली पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहेे. कुपवाड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा पोलीस दलातील कोरोनाचा हा पहिला बळी आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सांगली पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी..! - सांगली पोलीस कोरोना मृत्यू
कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असणाऱ्या सांगली पोलीस दलातही काही दिवसांपूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि आता पोलीस दलातल्या कर्मचार्याचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर कायम आहे आणि मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असणाऱ्या सांगली पोलीस दलातही काही दिवसांपूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि आता पोलीस दलातल्या कर्मचार्याचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
सांगलीच्या कुपवाड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी त्रास जाणवत असल्याने त्यांना सांगलीच्या एका खासगी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपासून शरीरातील ऑक्सिजन लेवल खालावल्याने प्रकृती गंभीर बनली होती आणि बुधवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनीही दुजोरा दिला आहे.