सांगलीप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाचा खुनाचा छडा सांगली पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पैसे उकळण्यासाठी अपहरण करण्यात आले. या दरम्यान झालेल्या मारहाणीत बेशुद्ध झालेल्या माणिकराव पाटील यांना मृत समजून जिवंतच वारणा नदीमध्ये नदीपात्रात फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला आहे.
बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन खून करणाऱ्या तिघांना सांगली पोलिसांकडून अटक - सांगली बांधकाम व्यावसायिक खून बातमी
बांधकाम व्यवसायिक असणाऱ्या माणिकराव पाटील यांचा अपहरण कोणी आणि कोणत्या कारणातून केले आणि खून कसा केला ? याचा छडा लावणे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान बनले होते. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी तपास करत खूनाचा छडा लावला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. किरण रणदिवे,वय 26,अनिकेत ऊर्फ निलेश दुधारकर ,वय 22 आणि अभिजित चंद्रकांत कणसे ,वय 20 सर्व राहणार कारंदवाडी,तालुका वाळवा,असे नावे आहेत.
या प्रकरणी तिघांना अटक सांगली शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय माणिकराव पाटील यांचा 13 ऑगस्ट 2022 रोजी मिरज तालुक्यातल्या तुंग येथून अपहरण करण्यात आले होते.जमीन दाखवण्याच्या पाहण्याने त्यांना बोलवण्यात आल्या त्यानंतर त्यांचा अपहरण करत खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर माणिकराव पाटील यांचा मृतदेह कवठेपिरान येथील वाण्या नदीपात्रामध्ये आढळून आला होता. बांधकाम व्यवसायिक असणाऱ्या माणिकराव पाटील यांचा अपहरण कोणी आणि कोणत्या कारणातून केले आणि खून कसा केला ? याचा छडा लावणे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान बनले होते. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी तपास करत खूनाचा छडा लावला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. किरण रणदिवे,वय 26,अनिकेत ऊर्फ निलेश दुधारकर ,वय 22 आणि अभिजित चंद्रकांत कणसे ,वय 20 सर्व राहणार कारंदवाडी,तालुका वाळवा,असे नावे आहेत.
हातपाय बांधून वारणा नदी पात्रामध्ये फेकले या तिघांना आर्थिक अडचण होती. त्यातून कुणाचा तरी अपहरण करायचं आणि पैसे मिळवायचे. यातून त्यांनी माणिकराव पाटील या बांधकाम व्यवसायिकाच्या अपहरण करायचे ठरवले. त्यानुसार तिघांनी माणिकराव पाटील यांना तुंग येथे बोलवून घेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माणिकराव पाटलांनी आरडाओरडा सुरू केला. त्यातून तिघांनी माणिकराव पाटील यांना मारहाण करत तोंड दाबले. त्यामुळे माणिकराव पाटील बेशुद्ध झाले होते. त्यानंतर तिघांनी माणिकराव पाटील यांना गाडीच्या डिगीत टाकून तिथून पलायन केलं. त्यानंतर माणिकराव पाटील शुद्धीवर आल्यावर त्यांच्या घरच्यांच्याकडून पैसे उकळण्याचा ठरवलं. मात्र माणिकराव पाटील शुद्धीत आले नाहीत. त्यामुळे तिघांनाही माणिकराव पाटील यांचा मृत्यू झाल्याचं वाटले. त्यातुन माणिकराव पाटलांचे हातपाय बांधून त्यांना वारणा नदी पात्रामध्ये फेकण्यात आल्याची कबुली तिघा संशयितांना दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.