सांगली-शहर पोलिसांनी दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावला आहे.याप्रकरणी पाच जणांना अटक करत ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या कडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी लावला दुचाकी,मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा छडा; 5 जणांना अटक - सांगली पोलीस न्यूज
सांगली शहर पोलिसांनी दुचाकी,मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावला आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून 3 दुचाकी आणि 2 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

दुचाकी आणि मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक
सांगली शहरातील दुचाकी चोरीचा तपास करत असताना शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून संशयित संतोष कुरणे याच्यासह पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून ३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यानंतर त्यांना अटक करत चोरीतील ३ दुचाकी आणि दोन मोबाईल हस्तगत केले आहेत. पुढील तपासात आणखी दुचाकी आणि मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.