महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार पडळकरांच्या निषेधार्थ सांगलीत राष्ट्रवादीकडून जोडे मारो आंदोलन - sangli ncp latest news

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्याचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. सांगलीतही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार पडळकर यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे.

sangli ncp
आमदार पडळकरांच्या निषेधार्थ सांगलीत राष्ट्रवादीकडून जोडे मारो आंदोलन

By

Published : Jun 24, 2020, 8:34 PM IST

सांगली- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ सांगली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत, राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार पडळकर यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

आमदार पडळकरांच्या निषेधार्थ सांगलीत राष्ट्रवादीकडून जोडे मारो आंदोलन

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्याचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. सांगलीतही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार पडळकर यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादी व युवक राष्ट्रवादीकडून जोरदार निदर्शने करत आमदार पडळकर यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे. सांगलीतील मिरज रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेस भवन समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून संताप व्यक्त केला आहे. तसेच पडळकर यांची लायकी काय? असा सवाल उपस्थित करत पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पडळकर यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details