महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली महापालिकेकडून अतिधोकादायक इमारतींवर हातोडा; 12 इमारती जमीनदोस्त

पालिका क्षेत्रात जवळपास 750 धोकादायक तर, 150 अतिधोकादायक इमारती असल्याचा अहवाल समोर आला होता. पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी धोकादायक बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते.

By

Published : Jul 19, 2019, 10:35 AM IST

अतिधोकादायक इमारतींवर कारवाईला सुरूवात

सांगली- शहरात प्रशासनाकडून महानगरपालिका क्षेत्रातील 35 अतिधोकादायक इमारती पाडण्याची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 12 धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून, पालिका क्षेत्रात सुमारे 750 इमारती धोकादायक तर, 150 इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया

मुंबईतील डोंगरी भागातील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेने सांगली, मिरज आणि कुपवाड भागातील धोकादायक बांधकामांसंदर्भात ही खबरदारीची मोहीम राबवली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्यासोबतच धोकादायक बांधकामे पाडण्याचे आदेश पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा प्रशासनाला दिले होते. यानुसार पालिका क्षेत्रात जवळपास 750 धोकादायक तर, 150 अतिधोकादायक इमारती असल्याचा अहवाल समोर आला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाने अतिधोकादायक असणाऱ्या इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील एकूण 15 इमारतींवर कारवाई झाली आहे. जोरदार पाऊस पडल्यास या इमारती कोसळण्याची शक्यता होती. यामुळे तातडीची खबरदारी म्हणून पालिकेने संबंधित मोहीम हाती घेतली. स्थानिक रहिवाशांना आणि घर मालकांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details