महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली महापालिकेकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू - सांगली कोरोना न्यूज अपडेट

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सांगली महापालिकेने तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना आहे, असा दावा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली महापालिका क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन, मनपा क्षेत्रात टास्क फोर्स, हेल्पलाईन आणि चाईल्ड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त नितिन कापडणीस यांनी दिली आहे.

सांगली महापालिका
सांगली महापालिका

By

Published : May 11, 2021, 6:14 PM IST

Updated : May 11, 2021, 8:09 PM IST

सांगली -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सांगली महापालिकेने तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना आहे, असा दावा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली महापालिका क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन, मनपा क्षेत्रात टास्क फोर्स, हेल्पलाईन आणि चाईल्ड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त नितिन कापडणीस यांनी दिली आहे.

सांगली महापालिकेकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू

तिसऱ्या लाटेसाठी पालिकेची तयारी

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी प्रशासन लढत आहे. यातच आता सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा सर्वाधिक प्रभाव हा लहान मुलांवर असणार आहे. त्यामुळे सांगली महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची देखील तायारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या अध्यक्षतेखील महापालिका क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये बालरोग तज्ज्ञांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी बालकांची कशापद्धतीने काळजी घेतली पाहिजे, याबाबत पालिका प्रशासनाला माहिती दिली. तसेच पालिकेनेही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी मनपा क्षेत्रात टास्क फोर्स, हेल्पलाईन आणि चाईल्ड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा -मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, असा दावा केला नाही -किशोरी पेडणेकर

Last Updated : May 11, 2021, 8:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details