सांगली -राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सांगली महापालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपायांवर भर देण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी आणि मॉलमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर मंदिर, मंगल कार्यालयांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
माहिती देताना सांगली महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे हेही वाचा -अहमदनगरच्या डोंगरगणमध्ये प्रशासनानेच फिरवला उभ्या पिकावर जेसीबी; रस्त्याचा वाद चिघळला
500 हून अधिक जणांवर कारवाई
आतापर्यंत महापालिका प्रशासनाने शहरात विनामास्क फिरणाऱ्या 500 हून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई करून दीड लाखाचा दंड वसूल केला आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे आणि पथकाकडून शहरात धडक कारवाई सुरू आहे. तसेच, जनतेने शासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा -कोरोना पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर मंदिराचा रिऍलिटी चेक; मास्कचा वापर पण फिजिकल डिस्टन्सचा फज्जा