सांगली - महापालिकेतील भाजपचे महापौर आणि उपमहापौर यांनी पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपल्याने तसेच पक्षाच्या आदेशानुसार हे राजीनामे देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक दिवस सुरू असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेवर भाजपची सत्ता होती. मिरजच्या नगरसेविका संगीता खोत यांची महापौर तर सांगलीचे नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांची उपमहापौर पदी निवड झाली. महापौर व उपमहापौरांच्या निवड प्रक्रियेवेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षांची मुदत देण्यात आली. ही मुदत संपल्यानंतरही महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामे दिले नाहीत. यामुळे काही इच्छुकांनी पक्ष श्रेष्ठींवर दबाव टाकत पदाधिकारी बदलण्याची मागणी केली.