- ७. ४० - भाजपचे संजयकाका पाटील यांचा विजय
- २:५३ -भाजपचे संजयकाका पाटील 70 हजार 583 मतांनी आघाडीवर
- २:०० - सांगली लोकसभा सातवी फेरी -
भाजप- संजयकाका पाटील २ लाख १९ हजार ५१५ मते
वंचित बहुजन आघाडी - गोपीचंद पडळकर १ लाख २३ हजार ३१२ मते
स्वाभिमानी पक्ष - विशाल पाटील १ लाख ४८ हजार ९३२ मते
- २:३४ -संजय पाटील ६३ हजार ९४१ मतांनी आघाडीवर
- १२:२६ -संजयकाका पाटील ३९ हजार ४८१ मतांनी आघाडीवर
- १२:०७ - संजयकाका पाटील ३४ हजार मतांनी आघाडीवर
- १०:१२ -संजयकाका पाटील ९ हजार मतांनी आघाडीवर
- १०:०९ - दुसऱ्या फेरीत संजयकाकांना १६ हजार ४१२, गोपीचंद ११ हजार २९० तर विशाल पाटील यांना १० हजार ७३८ मते
- १०:०८ -पहिल्या फेरीत भाजपच्या संजयकाका पाटील यांना १० हजार ३७२, गोपीचंद पडळकर ८ हजार ३३९ तर विशाल पाटील यांना ६ हजार मते
- ९:४७ - भाजपचे संजयकाका पाटील २ हजार ३१ मतांनी आघाडीवर
- ९:१७ - सांगलीत विशाल पाटील १२०० मतांनी आघाडीवर
- ९:१५ - मतमोजणी प्रतिनिधी आणि पोलिसांचे मध्ये प्रवेशावरून वादावादी
- ९:१४ - सांगलीत ४५ मिनीटे उशीराने मतमोजणीला सुरूवात
- ८:०० - सांगली मतदारसंघातील मतमोजणीला उशीर
सांगली- सांगली मतदारसंघातील मतमोजणीला उशीर झाला. मिरज येथील सेंट्रल वेअरहाऊस कार्पोरेशन गोडाऊनमध्ये ही मतमोजणी झाली आहे. यावेळी या मतदार संघातून भाजपचे संजयकाका पाटील तर आघाडीकडून स्वाभिमानीतर्फे विशाल पाटील हे मैदानात उतरले होते. तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर उभे राहिल्याने विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले. मात्र पाटील आणि पडळकर यांचा पराभव करत भाजपच्या संजयकाका पाटील यांनी बाजी मारली.
सांगली लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात मिरज, सांगली, जत, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, तासगांव-कवठेमहांकाळ यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये येथे ६३.५२ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी ६५.४१ टक्के मतदान झाले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ ७० वर्षे काँग्रेस आणि ३५ वर्षे वसंतदादा पाटील यांच्या हातात राहिला आहे. वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी सांगली लोकसभेचे २ वेळा नेतृत्व केले. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपच्या संजय पाटील यांनी तब्बल २ लाख ३८ हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणुकीच्या विजयाचे परिणाम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावरही झाले. ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात ३ भाजप आणि १ शिवसेनेचा आमदार आहे.