महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Khanapur Nagar Panchayat Election : 102 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांतील 102 नगर पंचायतींमध्ये आज निवडणुका ( Maharashtra Local Body Elections 2021 ) पार पडत आहेत. सांगली जिल्ह्यातील ( Sangli Local Body Elections 2021 ) कवठेमंकाळ, कडेगाव, खानापूर या तीन नगरपंचायतीच्या 39 जागांसाठी आज मतदान होत आहे. खानापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी ( Khanapur Nagar Panchayat Election ) 102 वर्षांच्या आजी शांताबई लवजी मोरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Dec 21, 2021, 3:46 PM IST

Updated : Dec 21, 2021, 4:04 PM IST

सांगली- महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांतील 102 नगर पंचायतींमध्ये आज निवडणुका ( Maharashtra Local Body Elections 2021 ) पार पडत आहेत. सांगली जिल्ह्यात तीन नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान ( Sangli Local Body Elections 2021 ) सुरू असून, मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरुण आणि वृद्ध मतदार ही मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येत आहेत. खानापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी ( Khanapur Nagar Panchayat Election ) 102 वर्षांच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला ( 102 Years Old Lady Casts Her Vote ) आहे. शांताबाई लवजी मोरे या ठिकाणी काँग्रेस-शिवसेना आघाडी, राष्ट्रवादी व भाजप, अशी तिरंगी लढत होत आहे. तर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

102 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क

39 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात

सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव, खानापूर आणि कवठे महांकाळ येथील नगर पंचायत निवडणूकीसाठी अत्यंत चुरशीने प्रचार झाला होता. आता मतदान पार पडत आहे. मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अनेक मतदान केंद्रावर सकाळी मतदारांच्या रांगा पहायला मिळाल्या. प्रत्येकी 13 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेसाठी चोख नियोजन करण्यात आले असून, खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीसाठी दीड वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

नगरपंचायत दीड वाजपर्यंत झालेले मतदान (टक्केवारीमध्ये)
कवठेमहांकाळ 52.75
खानापूर 58.57
कडेगाव 48.79

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

कडेगाव नगरपंचायतमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि इतर स्थानिक आघाड्या अशी बहुरंगी लढत असून, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख ( Ex MLA Prithviraj Deshmukh ), संग्रमसिंह देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड ( MLA Arun Lad ) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खानापूर नगरपंचायतमध्ये ( Khanapur Nagar Panchayat ) सध्या काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता असून, याठिकाणी काँग्रेस, शिवसेना आघाडी विरुद्ध भाजपा आणि राष्ट्रवादी व स्थानिक आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. याठिकाणी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर ( MLA Anil Babar ) आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ( MLA Gopichand Padalkar ) व स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्ष आघाडी अशी लढत पाहायला मिळत आहे. सध्या भाजपा खासदार संजयकाका पाटील ( MP Sanjaykaka Patil ) आणि माजी मंत्री अजीतराव घोरपडे ( Ex Minister Ajitrao Ghorpade ) यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय स्थानिक आघाडीची याठिकाणी सत्ता आहे. आता याठिकाणी दिवंगत आर.आर.पाटील ( R R Patil ) यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या विरोधात भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे माजी मंत्री अजितराव घोरपडे तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जयंत पाटील याचा कट्टर समर्थक असणाऱ्या सगरे व कोठावळे गटाने एकत्र येत मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

हे ही वाचा -Kavathe Mahankal Nagar Panchayat Election : कवठेमहांकाळ नगरपंचायतीत शंभर टक्के राष्ट्रवादीची सत्ता येईल - रोहित पाटील

Last Updated : Dec 21, 2021, 4:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details