महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली विधानपरिषदः भाजप नेते पृथ्वीराज देशमुखांचे नाव आघाडीवर; मुख्यमंत्र्यांकडून आले बोलवणे

काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपकडून सांगली भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने देशमुख यांना कागदपत्रांसह बोलवून घेतले आहे. सध्या देशमुख हे मुंबईत पोहोचले आहेत.

पृथ्वीराज देशमुख

By

Published : May 27, 2019, 3:13 PM IST

सांगली- काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागेवर भाजपकडून सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. कदाचित आज देशमुख हे भाजपकडून अर्ज भरतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपकडून सांगली भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने देशमुख यांना कागदपत्रांसह बोलवून घेतले आहे. सध्या देशमुख हे मुंबईत पोहोचले आहेत. शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर काँग्रेसकडून निवडणूक लढवली जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र काँग्रेसचे असणारे संख्याबळ लक्षात घेता या ठिकाणी काँग्रेस निवडणूक लढवणार नाही, अशी स्थिती आहे.


त्यामुळे भाजपचे उमेदवार या ठिकाणी बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दिवंगत शिवाजीराव देशमुख हे सांगलीचे असल्याने त्यांच्या जागी भाजपकडून सांगलीचा उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे, भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या गळ्यात ही उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी जिल्ह्यात भाजपचे केलेले मजबूत संघटन आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजय काका पाटील यांच्या विजयात देशमुख यांचा असणारा मोलाचा वाटा, यामुळे देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.


अद्याप भाजपकडून अधिकृत देशमुख यांचे नाव जाहीर करण्यात आले नाही, मात्र देशमुख यांना तातडीने मुंबईला बोलवून घेण्यात आले आहे. ७ जूनला पोटनिवडणुकीसाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे अपुरे संख्याबळ लक्षात घेता, या निवडणुकीत उमेदवार उतरवलील अशी स्थिती नसल्याने, भाजप उमेदवाराविरोधात कुणाचा अर्ज भरला गेला नाही तर पृथ्वीराज देशमुख यांच्या गळ्यात बिनविरोध विधानपरिषदेचे आमदारकी पदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details