इंग्लंडहून परतलेले पाच प्रवासी गायब; आरोग्य प्रशासनाला फुटला घाम..! - सांगली कोरोना अपडेट
इंग्लंडहून सांगली जिल्ह्यात 31 प्रवासी परतले आहेत. यामधील 26 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, उर्वरित पाच प्रवाशांचा थांगपत्ता लागत नाही, सदर प्रवाशांचा मोबाईलही बंद लागत असून ते प्रवाशी कर्नाटकात गेल्याची माहिती समोर आल्याने गोंधळ उडाला आहे.
सांगली
सांगली- इंग्लंडहून सांगली जिल्ह्यात 31 प्रवासी परतले आहेत. यामधील 26 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, उर्वरित पाच प्रवाशांचा थांगपत्ता लागत नाही, सदर प्रवाशांचा मोबाईलही बंद लागत असून ते प्रवाशी कर्नाटकात गेल्याची माहिती समोर आल्याने जिल्हा आरोग्य प्रशासनाला धडकी भरली आहे.
इंग्लंडचे पाच प्रवाशी गायब, प्रशासनाला फुटला घाम..
मात्र, यापैकी पाच प्रवाशी जिल्ह्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून इंग्लंडहून आलेल्या 'त्या' पाच प्रवाशांचा शोध आरोग्य प्रशासनाकडून घेण्यात येते आहे. तर त्या सर्वांचे मोबाईलही बंद येत आहेत. त्यामुळे युद्ध पातळीवर प्रवाशांचा शोध घेण्यात येत असून संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांकडून ते सर्वजण कर्नाटकमध्ये गेल्याची माहिती समोर आल्याचे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.