सांगली - 29 ऑगस्टला जगविख्यात पॉप सिंगर मायकल जॅक्सनची जयंती होती. याचे औचित्यसाधून सांगलीच्या किरण होळकर या तरुणीने सलग दोन तास मायकल जॅक्सनच्या बावीस गाण्यांवर पॉप स्टाईलमध्ये नृत्य करून मायकलला अभिवादन केले. सांगलीच्या पत्रकार भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
सलग दोन तास पॉप सिंगिंग आणि डान्स करत मायकल जॅक्सनला अभिवादन
संपूर्ण जगाला पॉप सिंगिंग आणि डान्सचे वेड लावणाऱ्या मायकल जॅक्सनचे फॅन्स (चाहते) अजूनही त्याला विसरलेले नाहीत. मुंबईत स्थिती असणारी मात्र, मूळची सांगलीतील असणारी डान्सर किरण होळकर ही देखील मायकल जॅक्सनची खूप मोठी चाहती आहे. तिने सलग दोन तास सिंगिंग आणि डान्स करून त्याला अभिवादन केले.
संपूर्ण जगाला पॉप सिंगिंग आणि डान्सचे वेड लावणाऱ्या मायकल जॅक्सनचे फॅन्स (चाहते) अजूनही त्याला विसरलेले नाहीत. मुंबईत स्थिती असणारी मात्र, मूळची सांगलीतील असणारी डान्सर किरण होळकर ही देखील मायकल जॅक्सनची खूप मोठी चाहती आहे. मायकल जॅक्सन प्रमाणे हुबेहूब डान्स आणि गाणे ती सादर करते. काल मायकल जॅक्सनच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकांना थोडे मनोरंजन मिळावे या उद्देशाने किरण होळकर हिने सलग 2 तास डान्स आणि सिंगिंग करण्याचा कार्यक्रम केला.
मायकल जॅक्सनच्या प्रत्येक गाण्यात आणि डान्समध्ये एक प्रकारची प्रेरणा आणि जोश आहे. कोरोना संकटाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकामध्ये अशी उर्जा निर्माण होणे गरजेचे आहे, असे मत किरण होळकरने व्यक्त केले. सलग दोन तास सिंगिंग आणि डान्सचा जो उपक्रम पूर्ण केला, तो कोरोनाच्या संकटात काम करणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना समर्पित करत असल्याचेही किरणने सांगितले.