सांगली - महापालिकेचे माजी महापौर व काँग्रेस नगरसेवक हारूण शिकलगार यांचा आज मृत्यू झाला. मिरजेच्या मिशन रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने शिकलगार यांचे निधन झाले. मंगळवारी त्यांचा अँटीजेन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी सांगली महापालिकेचे माजी महापौर, काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक हारून शिकलगार यांचा मृत्यू झाला. मंगळवारी शिकलगार यांचा पालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात व तेथून त्यांना मिरजेच्या कोव्हिड सेंटर असणाऱ्या मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
सांगली : माजी महापौर हारुण शिकलगार यांचे निधन - सांगली कोरोना अपडेट
मिरजेच्या मिशन रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने शिकलगार यांचे निधन झाले. मंगळवारी त्यांचा अँटीजेन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
सांगली
दरम्यान, बुधवारी उपचार सुरू असताना शिकलगार यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. शिकलगार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. त्याचबरोबर 2016 ते 19 या कार्यकाळादरम्यान शिकलगार यांनी सांगली महापालिकेचे महापौर पद भूषविले होते. माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांचे ते कट्टर समर्थक होते.