महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंधरा दिवसापासून हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद - शिराळा बिबट्या न्यूज

मानव आणि बिबट्या संघर्ष वाढताना दिसत आहे. अनेक बिबटे जंगलातून मानवी वस्तीत येऊन हल्ले करत आहेत. शिराळा तालुक्यात देखील एका बिबट्याचा वावर होता. त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

leopard
बिबट्या

By

Published : Oct 1, 2020, 12:16 PM IST

सांगली - शिराळा तालुक्यातील मांगले व कांदे परिसरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले. गेल्या पंधरा दिवसापासून याठिकाणी बिबट्याचा वावर होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बिबट्याने कांदे येथील एका शेतकऱ्याची गाय व मांगले येथील एका शेळीवर हल्ला केला होता. मांगले ग्रामपंचायतीने वनविभागाला या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सांगितले होते.

पंधरा दिवसापासून हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद

वनविभागाने पंधरा दिवसापासून बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. मात्र, बिबट्या चकवा देण्यात यशस्वी होत होता. आज पहाटे मांगले येथील शिवडीवस्तीवर सापळा लावून त्यात शेळीला बांधण्यात आले. शेळीच्या अमिषाला फसून बिबट्या सापळ्यात अडकला. बिबट्याला वनविभागाने वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. यावेळी वनपाल देशमुख, हनुमंत पाटील, संभाजी पाटील व एस आर काळे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details