सांगलीचा पूर लागला ओसरू.. आता 'मिशन शहर स्वच्छ', सांगलीसह 5 पालिकांची स्वछता पथके ऑन फिल्ड - मिशन शहर स्वच्छ
सांगलीत महापूर ओसरल्यानंतर शहर पूर स्वच्छतेला महापालिकेने गती दिली आहे. महापालिकेच्या मदतीला मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, सोलापूर या चार महापालिकेच्या टीमसुद्धा आल्या असून 200 हtन अधिक वाहने आणि 2 हजाराहून अधिक कर्मचारी सांगलीच्या स्वच्छतेसाठी उतरले आहेत
सांगली - सांगलीत महापूर ओसरल्यानंतर शहर पूर स्वच्छतेला महापालिकेने गती दिली आहे. महापालिकेच्या मदतीला मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, सोलापूर या चार महापालिकेच्या टीमसुद्धा आल्या असून 200 हtन अधिक वाहने आणि 2 हजाराहून अधिक कर्मचारी सांगलीच्या स्वच्छतेसाठी उतरले आहेत. युद्धपातळीवर सांगली शहर स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.
युद्धपातळीवर शहर स्वच्छता मोहीम..
सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 55 फुटावर गेल्यानंतर निम्मे शहर जलमय झाले होते. सोमवारपासून पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाल्यानंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नियोजनानुसार महापालिकेकडून स्वच्छता औषध आणि धूर फवारणी हाती घेण्यात आली आहे. याचबरोबर पाणी ओसरल्यावर निर्माण झालेला राडारोडा उचलून रस्ते स्वच्छ करण्याचे कामही गतीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी सांगली महापालिकेचे आरोग्य कर्मचारी स्वच्छता करत आहेतच, याशिवाय पुणे, मुंबई, सोलापूर, पिंपरी या महापालिकांच्या टीमची स्वच्छतेसाठी दाखल होत स्वच्छता सुरू केली आहे. सांगली शहर, सांगलीवाडी, मिरजेच्या कृष्णा घाट परिसरात सुद्धा स्वच्छतेसाठी अन्य महापालिकांचे कर्मचारी काम करत आहेत. यासाठी 2 हजार कर्मचारी आणि 200 हून अधिक वाहने स्वच्छता कामात आहेत. यासह अन्य महापलिकांची टीमही सांगलीत येत असून सांगली शहरातील रस्ते चिखलमुक्त आणि कचरामुक्त करण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.