महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली : महापुराचा फटका जिल्हा कारागृहाला, सर्व कैदी सुरक्षित - sangli flood today

संपूर्ण कारागृह परिसराला चार ते पाच फुटांपर्यंत पाण्याचा वेढा पडला आहे. मात्र, या ठिकाणी असणारे कैदी सुरक्षित आहेत असा दावा कारागृह प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

sangli-flood-update-water-reaches-in-district-jail-all-prisoners-are-safe

By

Published : Aug 7, 2019, 1:19 PM IST

सांगली - शहरात महापुराने थैमान घातले आहे. सांगली जिल्ह्यातील जिल्हा कारागृह सुद्धा आता या पुराच्या विळख्यात अडकला आहे. सध्या या कारागृहामध्ये 340 कैदी आहेत. संपूर्ण कारागृह परिसराला चार ते पाच फुटांपर्यंत पाण्याचा वेढा पडला आहे. मात्र, या ठिकाणी असणारे कैदी सुरक्षित आहेत असा दावा कारागृह प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

सांगली : महापुराचा फटका जिल्हा कारागृहाला, सर्व कैदी सुरक्षित

सांगलीतील महापुराची परिस्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यातील पुराने २००५ च्या पुराचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. एनडीआरएफ आणि लष्कराच्या पथकांमार्फत मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details