महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सभासदांनी ५०० रुपयांच्या नोटा दाखवत सॅलरी सोसायटीच्या सभेत घातला गोंधळ - शेअर्स

१ हजार रुपये शेअर्स रक्कम रद्द करुन ५०० रुपये शेअर्स रक्कम करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सभासदांनी केली.

सांगली गोंधळ

By

Published : Jun 30, 2019, 5:10 PM IST

सांगली -दरवर्षीप्रमाणे यावेळीही सांगली अर्नर्स को-ऑपरेटिव्ह सॅलरी सोसायटीची सभा वादळी ठरली. सभासदांनी ५०० रुपये शेअर्स रक्कम करावी, या मागणीसाठी सभासदांनी सभेत नोटा दाखवत गोंधळ घातला. यामुळे यावेळीही गोंधळातच वार्षिक सभा पार पडली.

सभासदांनी ५०० रुपयांच्या नोटा दाखवत सॅलरी सोसायटीच्या सभेत घातला गोंधळ

शहरातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडलेल्या वार्षिक सभेत शेअर्सच्या रकमेवरून सभासदांनी गोंधळ घातला. १ हजार रुपये शेअर्स रक्कम रद्द करुन ५०० रुपये शेअर्स रक्कम करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सभासदांनी केली. यावेळी ५०० रुपयांच्या नोटा सभेत दाखवत सभासदांनी एकच गोंधळ घातला.त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाची ही वार्षिक सभा प्रचंड गोंधळात पार पडली.

सांगलीतील शासकीय नोकरदारांची असणारी सांगली अर्नर्स को-ऑप सोसायटीची वार्षिक सभा आज सांगलीत पार पडली आहे. यंदा सभेचे १०७ वे वर्षे आहे. १४ हजार सभासद संख्या असणाऱ्या सोसायटीच्या वार्षिक सभेत दरवर्षी गोंधळ होतो.

ABOUT THE AUTHOR

...view details