सांगली - ऊस आंदोलनातून शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर हल्ल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात अशोक माने यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून माने यांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांकडून टाळाटाळा करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील केला. तसेच हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.
ऊस आंदोलनातून शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला, पोलिसांकडून कारवाईला टाळाटाळ - ऊस आंदोलन बातमी
सांगली जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर ऊस आंदोलनातू हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे.
ऊसाला 4 हजार दर आणि एकरकमी एफआरपी मिळावी, यामागणीसाठी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेकडून ऊस आंदोलान करण्यात आले होते. सांगली जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी कवठेमहांकाळ येथील रांजणी येथे कर्नाटक राज्यातील साखर कारखाण्यासाठी ऊस तोडी सुरू होत्या. त्या ऊस तोडी बंद पाडत, माने यांच्या नेतृत्वाखाली ऊस वाहतूक रोखण्यात आली होती. या आंदोलानाच्या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूकदरांच्याकडून रांजणी गावा नजीक पाळता ठेवून आठ दिवसांपूर्वी अशोक माने यांच्यावर 8 ते 10 हल्ला चढवण्यात आला होता. ज्यामध्ये माने यांच्या डोक्यात लोखंडी गजाने घाव घालत, लाथा बुक्क्यांनी त्यांना मारहाण करण्यात आली होती. यामध्ये माने यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला जोरदार मारा लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. 8 दिवसांपासून माने यांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कवठे महांकाळ पोलिसांकडून हल्ल्याबाबत गुन्हा दाखल करून घेण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप माने यांनी केला आहे.
या हल्ल्या बाबत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. हा जीवघेणा हल्ला करून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, आम्ही याला घाबरणार नाही, अद्याप पोलिसांच्याकडून माने यांचा जबाब घेण्यात आला नाही. यामुळे यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करत पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांना अटक करावी अशी मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.