महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना नियंत्रणासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी; जिल्हा सुधार समितीची मागणी - सांगली कोरोना अपडेट न्यूज

सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असून जिल्ह्याची सध्याची यंत्रणा निरूपयोगी ठरताना दिसत आहे. यासाठी विकेंद्रीत व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. कोरोना उपाययोजना करण्यासाठी अनुभवी व आयएएस दर्जाच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीने केली आहे.

Amit Shinde
अमित शिंदे

By

Published : Aug 29, 2020, 5:28 PM IST

सांगली - जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिकेने स्वतंत्र कोरोना सहाय्यता केंद्र उभारून त्याद्वारे अत्यावश्यक रूग्णांना बेडची व्यवस्था करून द्यावी. कोरोना उपाययोजना करण्यासाठी अनुभवी व आयएएस दर्जाच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अ‌ॅड. अमित शिंदे व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे केली आहे.

कोरोना नियंत्रणासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असून जिल्ह्याची सध्याची यंत्रणा निरूपयोगी ठरताना दिसत आहे. यासाठी विकेंद्रीत व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. मृत्यूच्या वाढत्या आकड्याने कोरोनाबाधीतांमध्ये प्रचंड धास्ती आहे. प्रकृती गंभीर असणाऱ्या कोरोना रुग्णांना बेड मिळत नाहीत. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत, असे लोक घरीच उपचार घेत आहेत. परंतु प्रशासनामधील कोणीही त्यांच्याकडे फिरकत नाही. महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना कोठेच दाद मागता येईना. कोरोना व्यतिरिक्त अन्य रूग्णही उपचाराविना मरत आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील स्थिती हाताळण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले असून या परिस्थितीला हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेने स्वतंत्र कोरोना सहाय्यता कक्ष सुरू करणे आवश्यक आहे. या कक्षाचे नियंत्रण करण्यासाठी, कोरोना परिस्थती हाताळण्याचा अनुभव असणाऱ्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी अमित शिंदे यांनी सुधार समितीतर्फे केली आहे. शासनाने सांगलीमधील कोरोना परिस्थती गांभीर्याने न घेतल्यास सविनय कायदेभंग आंदोलन करू, असा इशारा देखील शिंदे यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details