महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृष्णेची पाणी पातळी स्थिर, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची माहिती - कृष्णा नदी पूर बातमी

मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. मात्र, पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णेची पाणी पातळी स्थीर आहे. रात्री उशीरा पाणी कमी होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर जिल्हाधिकारी

By

Published : Sep 6, 2019, 8:51 PM IST

सांगली - दोन दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. मात्र, सध्या २९.३ फुटांवर कृष्णा नदीचे पाणि स्थिर आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कमी झालेला पाऊस, धरणातील विसर्ग यामुळे पाण्याची पातळी रात्री उशिरा कमी होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली.

कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर जिल्हाधिकारी


हवामान खात्याकडून सातारा कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याचा इशार देण्यात आला आहे. या परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी नागरिकांनी केले आहे.

गुरूवार सकाळपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. दहा फुटांवर असणारी पाण्याची पातळी शुक्रवार सायंकाळपर्यंत ३० फुटांपर्यंत पोहोचली होती. पाण्याची ही वाढती पातळी पाहता सांगलीमध्ये पुन्हा महापूर येणार अशी धास्ती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details