सांगली -कोरोना विरोधातील लढाईत आर्थिक स्वरूपात मदत देण्याचे आवाहन राज्य सरकारकडून अनेक सामाजिक संस्था, सहकारी संस्था आणि उद्योजकांना करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून राज्य शासनाला काही रक्कम देऊ केली आहे. बँकेने तब्बल सव्वा दोन कोटींची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. या मदतीचा धनादेश बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
कोरोनाच्या लढाईत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची मोठी मदत! तब्बल सव्वा दोन कोटींचा धनादेश सुपूर्द हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलासा! विधान परिषदेची निवडणूक २१ मे ला होणार, आयोगाची सशर्त परवानगी
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांच्या वतीने दिलीप पाटील यांनी हा धनादेश सुपूर्द केला
जिल्हा मध्यवर्ती बँकेला यंदाच्या वर्षी चांगला नफा झाला आहे. या नफ्यातून राज्य सरकारला मदत करत आहोत. कोरोनाविरोधात सरकार उत्तम प्रकारे लढत असून त्यात आपली छोटीसी मदत व्हावी, या उद्देशाने ही मदत केल्याची भावना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी व्यक्त केली. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मिळालेली मदत राज्य सरकारला कोरोनाच्या युद्धात खूप महत्त्वाची ठरणारी आहे. इतरही संस्था आणि बँकांनी अशाच पद्धतीने महाराष्ट्र सरकारला मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले.