सांगली - जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकूण 2435 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून 23 लाख 76 हजार 304 मतदार मतदानाचा हक्का बजावणार आहेत. यासाठी पोलीस बंदोबस्तात शनिवारी ईव्हीएम रवाना झाले.
2435 नियोजित मतदान केंद्रांपैकी 39 मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 11 हजार 230 कर्मचारी कार्यरत आहेत. अडीच हजार पोलीस कर्मचारी आणि 1600 होमगार्ड व राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. तर संवेदनशील मतदार केंद्रांच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.