सांगली स्वतःच्या नवजात मुलीचे हत्या करणाऱ्या आईला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुमित्रा गंगाप्पा जूटी असे या निर्दयी मातेचे नाव असून सांगली न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
सांगली न्यायालयाकडून नवजात मुलीचा गळा घोटणाऱ्या निर्दयी मातेला जन्मठेपेची शिक्षा - सांगली आईकडून नवजात स्त्री अर्भक हत्या
पोलिसांचे तपासामध्ये सदर महिलेनेच आपल्या नवजात अर्भक मुलीचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी सुमित्रा जूटी हीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा खटला सांगली न्यायालयामध्ये सुरू होता.या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी- पुराव्याच्या आधारे सुमित्री जुटी हिला दोषी ठरवत जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी वकील म्हणून ए.आर.देशमुख यांनी या खटल्याचे काम पाहिलं.
नवजात अर्भक मुलीचा दुपट्ट्याने गळा आवळून खून कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातल्या हुक्केरी तालुक्यातील करगुटी येथील सुमित्रा गंगाप्पा जूटी,वय 30 ही महिला 17 ऑक्टोबर 2020 रोजी सांगलीच्या शासकीय रुग्णालय या ठिकाणी प्रसुतीसाठी दाखल झाली होती. त्यानंतर सुमित्रा हिला मुलगी झाली, मात्र दिनांक 18 रोजी सदरच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला होता.विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली होती. पोलिसांचे तपासामध्ये सदर महिलेनेच आपल्या नवजात अर्भक मुलीचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी सुमित्रा जूटी हीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा खटला सांगली न्यायालयामध्ये सुरू होता.या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी- पुराव्याच्या आधारे सुमित्री जुटी हिला दोषी ठरवत जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी वकील म्हणून ए.आर.देशमुख यांनी या खटल्याचे काम पाहिलं.