महाराष्ट्र

maharashtra

लॉकडाऊनचा कंटाळा आलाय?; मग काढा सेल्फी, मिळवा बक्षीस...'या' पालिकेने सुरू केली स्पर्धा

By

Published : Apr 18, 2020, 5:03 PM IST

"सेल्फी विथ मास्क"ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना पालिकेकडून बक्षीस देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे.

लॉकडाऊनचा कंटाळा आलाय, मग काढा सेल्फी मिळवा बक्षीस...'या' पालिकेने सुरू केली स्पर्धा
लॉकडाऊनचा कंटाळा आलाय, मग काढा सेल्फी मिळवा बक्षीस...'या' पालिकेने सुरू केली स्पर्धा

सांगली -कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळलेल्या सांगलीकरांसाठी महापालिकेने मनोरंजनासाठी एक स्पर्धा सुरू केली आहे. "सेल्फी विथ मास्क"ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना पालिकेकडून बक्षीस देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. गेल्या २७ दिवसांपासून लोक घरात आहेत. त्यामुळे घरात राहून लोक कंटाळून गेले आहेत आणि अशा या कंटाळलेल्या नागरिकांसाठी सांगली महापालिकेने मनोरंजनासाठी एक स्पर्धा सुरू केली आहे.

महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी घरात राहून सेल्फीची ही स्पर्धा आयोजित केली आहे. "सेल्फी विथ मास्क" अशी ही स्पर्धा असून या स्पर्धेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण सेल्फी फोटो काढून तो पालिकेकडे पाठवायची आहे आणि या स्पर्धेतील विजेत्यांना पलिकेकडून अनेक बक्षीसे देण्यात येणार आहेत.

अशी आहे स्पर्धा -

1 ) 'selfie with mask competition' - आपला सेल्फी काढून 96896 96993 या क्रमांकावर पाठवा. सेल्फीसोबत आपले नाव टाईप करून पाठवा. नियम - १. सेल्फीत फक्त १ व्यक्ती असावा. २. सेल्फी सार्वजनिक ठिकाणी काढलेला नसावा. बक्षीसे - पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्र व मुव्ही टिकीट्स (लॉकडाऊन नंतर)

2 ) 'Selfie with funny/innovative mask competition' - आपला फनी/नावीन्यपूर्ण सेल्फी काढून 96896 96993 या क्रमांकावर पाठवा. सेल्फीसोबत आपले नाव टाईप करून पाठवायाचा आहे. नियम - १) सेल्फीत फक्त १ व्यक्ती असावा. २) सेल्फी सार्वजनिक ठिकाणी काढलेला नसावा. ३) फनी मास्क फक्त सेल्फीसाठीच वापरावा. बक्षीसे - पहिले बक्षीस - प्रमाणपत्र व N95 mask. दुसरे बक्षीस - प्रमाणपत्र व triple layer mask. तिसरे बक्षीस - प्रमाणपत्र व सॅनिटायझर बाटली. लॉकडाऊन काळात शुध्द मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांना कोरोनाच्या बाबतीत जागृती करण्याच्या आयोजित केली आहेत.

दररोज वेगवेगळ्या पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे, तर या स्पर्धेतील चांगले सेल्फी महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवर प्रदर्शित केले जाणार आहेत. कंटाळलेले सांगलीकर पालिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धेला कसा प्रतिसाद देतात, ते पाहावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details