महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हाथरस प्रकरण : सत्याग्रह आंदोलन करत सांगली काँग्रेसने नोंदवला योगी सरकारचा निषेध - sangli congress agtitation satyagrah

सांगली शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून बलात्कार घटनेच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

sangli congress agitation
सांगली काँग्रेस आंदोलन

By

Published : Oct 5, 2020, 3:54 PM IST

सांगली -उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील बलात्कार प्रकरणी काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध नोंदवला आहे. बलात्काराची घटना भाजपा सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनावेळी करण्यात आली आहे.

शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून बलात्कार घटनेच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सर्व प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसने यावेळी केली.

उत्तर प्रदेशमध्ये घडलेली बलात्काराची घटना निंदनीय आहे. ही सर्व घटना दडपण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. तसेच त्याबरोबर या सर्व प्रकरणी अद्याप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणात भाजपा सरकार दोषी आहे. देशांमध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे त्या ठिकाणी महिलांवर आणि विशेषतः दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत, असा आरोप यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला. तसेच काँग्रेस हे अत्याचार सहन करणार नाही. यापुढे तीव्र आंदोलने केली जातील, असा इशारा यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला.

काय आहे हाथरस प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. तिला उपचारासाठी दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर अनेक स्तरांवरुन उत्तरप्रदेश सरकारवर टीका होत आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details