महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#COVID 19 : सांगली जिल्ह्यासह शहराच्या सीमा बंद, प्रवेशासाठी नागरिकांची गर्दी - sangli

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सांगली जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. पण, कामानिमित्त बाहेरुन परतणाऱ्या तसेच कामासाठी सांगलीत जाणाऱ्यांची मोठी गर्दी टोल नाक्यावर झाली आहे.

गर्दी
गर्दी

By

Published : Mar 23, 2020, 2:45 PM IST

Updated : Mar 23, 2020, 3:42 PM IST

सांगली- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सांगली जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आता शहराच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, सांगली शहरात प्रवेश करण्यासाठी नागरिकांची तुडूंब गर्दी होत आहे. पण, विनाकारण शहरात येणाऱ्या नागरिकांना पोलीस परत पाठवत आहेत.

सांगली जिल्ह्यासह शहराच्या सीमा बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे. सांगली पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा बंद केले आहेत. सीमेवर पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच सांगली शहराच्याही सीमा पोलिसांनी आज सकाळपासून बंद केल्या आहेत. आसपासच्या गावातून आणि बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. सांगली शहरानजीकच्या असणाऱ्या सांगलवाडी येथील इस्लामपूर मार्गावरील टोल नाका याठिकाणी सकाळपासून नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या रांगा लागल्याने तोबा गर्दी झाली आहे.

मात्र, पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जात असून योग्य कारण असल्यासच संपूर्ण तपासणी करून प्रवेश देत आहेत. विनाकारण येणार्‍या नागरिकांना या ठिकाणाहून परत पाठवण्यात येत आहे.

हेही वाचा -३१ मार्चपर्यंत सांगली जिल्ह्याच्या सीमा बंद!

Last Updated : Mar 23, 2020, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details