सांगली -जिल्ह्यातील 29 व कोल्हापूर जिल्ह्यातील 29 धरणग्रस्त वसाहतीमध्ये शासनाच्या विरोधात नागरिकांनी सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यत आंदोलन केले. वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम समितीचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
पुनर्वसन अधिकारी यांची बदली व्हावी. धरणग्रस्ताना योग्य वागणूक मिळत नाही. प्रांताधिकारी 2 महिन्याला तर जिल्ह्यापुनर्वसन अधिकारी 4 महिन्याला आढावा बैठक घेत होते, आता त्यासुद्धा बंद केल्या. त्या वेळेवर व्हावे, धरणग्रस्तांना अपमानाची वागणूक दिली जाते. शासनाचे धरणग्रस्ताकडे दुर्लक्ष करत आहेत.