सांगली - हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदार संघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेस आघाडीच्या स्वाभिमानी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे हा पक्ष आता सांगलीत विशाल पाटील आणि हातकणंगल्यात राजू शेट्टींचा प्रचार करणार आहे.
सांगली, हातकणंगलेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आघाडीला पाठिंबा - विशाल पाटील
सांगली आणि हातकणंगलेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सांगली आणि हातकणंगले लोकसभा निवडणुकीबाबत आज आपली भूमिका स्पष्ट केली. दोन्ही मतदार संघात पक्षाकडून निवडणूक लढवण्यात येत नाही. यामुळे पार्टीने या मतदारसंघात संघात काँग्रेस महाआघाडीचे मित्र पक्ष असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पाठींबा देण्याची भूमिका जाहीर केली. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांवर दादागिरी करत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेत त्यांना देशोधडीला लावण्याचा उद्योग करत आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सांगली जिल्हा सचिव कॉम्रेड उमेश देशमुख यांनी यावेळी केला.