सांगली- नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि कॅब कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीत आज एमआयएम पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत एमआयएमच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.
प्रतिक्रिया देताना एमआयएमचे जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे केंद्र सरकारच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती आणि कॅब विधेयक कायदा मंजूर करण्यात आला आहे. याविरोधात देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. जिल्ह्यातही एमआयएम पक्षाच्या वतीने सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. एमायएमचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
केंद्रातील भाजप सरकार हे जातीयवादी असून नागरिकत्व दुरूस्ती आणि कॅब कायदा हा जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारा कायदा आहे. त्याचबरोबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या राज्य घटनेला तिलांजली देण्याचे धोरण केंद्रातील भाजप सरकारने घेतला असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने तातडीने एनआरसी आणि कॅब हा कायदा रद्द करावा. तसेच, सरकारने या मागण्यांची दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एमआयएम पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे.
हेही वाचा-५ हजारांची लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यांसह तिघांना अटक