महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत डेंग्यूचे थैमान; दोघांचा मृत्यू, तर चौघांना लागण - sangli dengue deaths

जत तालुक्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातल्याने गेल्या दोन दिवसात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त आणखी 4 जणांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सागर शिवसरण(वय-27) व कल्याणी पाटील(वय-06) अशी मृतांची नावे आहेत.

By

Published : Oct 29, 2019, 5:01 PM IST

सांगली - डेंग्यूच्या साथीने जत तालुक्यातील 2 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एक तरुण व एका चिमुरडीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आणखी 4 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जत तालुक्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातल्याने गेल्या दोन दिवसात 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

जत तालुक्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातल्याने गेल्या 2 दिवसांत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सागर शिवसरण(वय-27) व कल्याणी पाटील (वय-06), अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होऊन प्रकृती खलवल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

जत शहरातील अन्य चौघांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. या रुग्णांना तत्काळउपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डेंग्यूच्या साथीमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या बाबतीत नागरिकांना परिसरात स्वच्छता राखावी. तसेच पाणी साठवून ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details