सांगली - घरची परिस्थिती गरिबीची असून घरात लाईटही नाही अशा परिस्थितीशी सामना करत व बाहेरील कोणततेही क्लासेस न लावता योगिताने तासंतास दिव्याखाली अभ्यास करून बारावीमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. यामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दिव्याच्या उजेडात अभ्यास करत 'ती'ने मिळवले बारावीच्या परीक्षेत ७१ टक्के गुण
कोरोनामुळे सर्व कार्यक्रम बंद झाले आणि घरी अठरा विश्व दारिद्र आले. राहिले साधे छप्पर वजा घर. पण कित्तेक वर्षांपासून घरात लाईटची सोय ही नाही. पण या सर्वांचे कधी योगिताने दडपण घेतले नाही, की कधी भांडवल ही केले नाही. या सर्व परस्थितीशी जुळवून घेत योगिता तासंतास दिव्या खाली अभ्यास करत राहिली.
जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील राजेंद्र कांबळे व पत्नी सविता हे मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. राजेंद्र कांबळे कलाकार असून वेगवेगळ्या बँजो ग्रुपमध्ये ऑर्गन वाजवण्याचे काम करत असतात. परंतु सध्या कोरोनामुळे सर्व कार्यक्रम बंद झाले आणि घरी अठरा विश्व दारिद्र आले. राहिले साधे छप्पर वजा घर. पण कित्तेक वर्षांपासून घरात लाईटची सोय ही नाही. पण या सर्वांचे कधी योगिताने दडपण घेतले नाही, की कधी भांडवल ही केले नाही. या सर्व परस्थितीशी जुळवून घेत योगिता तासंतास दिव्या खाली अभ्यास करत राहिली.
इतर मुलीप्रमाणे शाळेत लागणारे साहित्यासाठी कधी रुसवे फुगवे केले नाही.आईवडिलांच्या मोल-मजुरीतून येणाऱ्या पैशातून फक्त घर खर्च चालत असल्याने योगिताने बाहेरील अभ्यासक्रम ही लावला नाही. नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत 71 टक्के गुण मिळवून यश खेचून आणले. सर्व सोई सुविधा व बाहेरील क्लासेस लावून अव्वल नंबरात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढे योगिताने एक आदर्श ठेवलाआहे. योगिताला यासाठी घरातून आई-वडील व भाऊ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. मोठा भाऊ योगेश कांबळे खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. यामुळे चिखलातच कमळ उगवते हे योगिताने दाखवून दिले आहे. झोपडीत सुविधेचा अभाव आणि गरिबीचा अंधार पण योगिताने अभ्यासाच्या जोरावर पडलेल्या उजेडात अख्या कांबळे कुटुंबाबरोबर ऐतवडे गाव ही झळाळून निघालेले आहे. यामुळे शिक्षणाचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कर्मभूमीत योगिता हिच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.