शिराळा (सांगली) -जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गांवर असताना रेठरे धरण येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि इस्लामपूरसह सर्व यंत्रणा हादरून गेली. त्यातून सावरतोय तोपर्यंत मुंबईवरून आलेल्या निगडी येथील 23 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाल्याने शिराळा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना : 30 तारखेपर्यंत शिराळा बंद, बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश नाही - नगराध्यक्षा अर्चना बसवेश्वर शेटे - latest shirala news
शिराळ्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी नगराध्यक्ष अर्चना शेटे यांनी गावच्या चारी बाजूच्या सीमा बंद केल्या असून बाहेरून येणाऱ्या लोकांना प्रवेश देणे बंद केले आहे. त्याचबरोबर शिराळ्यामध्ये संस्था विलगीकरणाच्या शाखा उपलब्ध केल्या आहेत.
शिराळा तालुका हा डोंगरी भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात मुबंईत कामानिमित्त वास्तव्यास आहेत. परंतु, सध्या लॉकडाऊन असल्याने या सर्वांनी आपला मोर्चा शिराळ्याच्या दिशेने वळवला आहे. यामुळे शिराळा तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा विचार करून शिराळ्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी नगराध्यक्ष अर्चना शेटे यांनी गावच्या चारी बाजूच्या सीमा बंद केल्या असून बाहेरून येणाऱ्या लोकांना प्रवेश देणे बंद केले आहे.
त्याचबरोबर शिराळ्यामध्ये संस्था विलगीकरणाच्या शाखा उपलब्ध केल्या आहेत. येत्या 30 तारखेपर्यंत शिराळा बंद ठेण्यात येणार आहे. निगडी येथील कोरोनाबाधित कुटुंबातील व्यक्तींना शिराळा येथील निवासी वसतिगृहात आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा अर्चना बसवेश्वर शेटे यांनी सांगितले.