सांगली -शहर आणि परिसरात आलेल्या महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुरानंतर उद्भवणाऱ्या रोगराईच्या संकटाला परतवून लावण्यासाठी शहरामध्ये सध्या स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू असून तीन हजारांहून अधेक लोक स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत, अशी माहिती सांगली महानगरपालिकेच्या महापौर संगीता खोत यांनी दिली आहे.
सांगली शहरात स्वच्छता मोहीम युध्दपातळीवर, स्वच्छतेसाठी सारसावले हजारो हात - आयुक्त नितीन कापडणीस
महापुरानंतर उद्भवणाऱ्या रोगराईच्या संकटाला परतवून लावण्यासाठी आता सांगली शहरामध्ये स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते शहराच्या स्वच्छतेसाठी कार्य करत आहेत.
![सांगली शहरात स्वच्छता मोहीम युध्दपातळीवर, स्वच्छतेसाठी सारसावले हजारो हात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4119836-174-4119836-1565667464314.jpg)
शहर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या मदतीला राज्यातील पालिका कर्मचारी दाखल
सात दिवसांपासून कृष्णेच्या महापुरात अडकलेल्या सांगली शहराची हळूहळू मुक्तता होत आहे. हजारो लोक या महापुरामुळे बेघर झाले आहेत. संपूर्ण शहर पाण्याखाली होतं, पण आता पूर जवळपास ओसरला आहे. मात्र आता त्या ठिकाणी एक नवे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे, ते म्हणजे रोगराई. या सर्व पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहेत. तसेच सांगली शहर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या मदतीला राज्यातील इतर पालिकेचे कर्मचारी दाखल झाले आहेत. अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांचाही मोठा सहभाग स्वच्छतेमध्ये दिसून येत आहे. जवळपास तीन हजाराहून अधिक हात सांगलीच्या स्वच्छतेसाठी झटत आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला कचरा काढणे, औषध फवारणी काम युद्धपातळीवर काम सुरू आहे. पालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस आणि सांगलीच्या महापौर संगीता खोत यांनी सांगलीच्या शहर स्वच्छतेसाठी नागरिकांना आणखी योगदान द्यावे, जेणेकरून रोगराईला टाळता येईल असे आवाहन केले आहे. स्वच्छ सांगली व पुरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.