महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पुष्पा'चा थरार मिरजेत.. तब्बल अडीच कोटीचे रक्तचंदन जप्त, बंगळुरुहून कोल्हापूरकडे तस्करी करताना कारवाई - मिरजेत अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त

सांगली जिल्ह्यातील मिरजेत तब्बल अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. बंगळुरूहून कोल्हापूरकडे अवैध तस्करी सुरू असताना एक टन चंदन जप्त करण्यात आले असून या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. मिरज पोलिसांनी ही कारवाई केली.

sandalwood smuggling
sandalwood smuggling

By

Published : Jan 31, 2022, 1:03 PM IST

Updated : Jan 31, 2022, 1:17 PM IST

सांगली - सांगली जिल्ह्यातील मिरजेत तब्बल अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. बंगळुरूहून कोल्हापूरकडे अवैध तस्करी सुरू असताना एक टन चंदन जप्त करण्यात आले असून या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. मिरज पोलिसांनी ही कारवाई केली.

मिरजेत सापडले अडीच कोटींचे रक्तचंदन -
सध्या देशभरात पुष्पा चित्रपटामुळे रक्तचंदन हे चांगलेच चर्चेत आले आहे. रक्त चंदनाचा व्यापार आणि रक्तचंदन तस्करी यावर हा चित्रपट आधारित आहे. या रक्तचंदनाची चर्चा सुरु असताना मिरजमध्ये तब्बल अडीच कोटींचे रक्तचंदन सापडले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

टेम्पोमधून सुरू होती तस्करी -
मिरज पोलिसांना आणि सांगलीच्या वन विभागाला अवैधरित्या चंदन तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर रस्त्यावरील जकात नाका या ठिकाणी सापळा रचण्यात आला. या वेळी एका टेम्पोची तपासणी करण्यात आली असता, त्या टेम्पोमध्ये रक्तचंदन आढळून आले.

कारवाईची माहिती देताना पोलीस अधीक्षक
बंगळुरुहून कोल्हापूरकडे निघाला होते रक्तचंदन -
टेम्पोच्या आत बाहेरील भागात प्लास्टिकची कॅरेट आणि त्याच्या आत हे रक्त चंदन लपवण्यात आले होते. 32 रक्तचंदनाचे ओंडके यावेळी सापडले आहेत. सुमारे एक टन इतके वजनाचे रक्त चंदन आहे. याची किंमत 2 लाख 45 हजार रुपये इतकी आहे. बंगळुरूरहून हे रक्तचंदन मिरज मार्गे कोल्हापूरकडे जात होते, अशी माहिती सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. चंदन तस्करी प्रकरणी यासीन इनायत उल्ला खान यास अटक करण्यात आली आहे. या तस्करी मागे आंतरराज्य टोळी असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.
Last Updated : Jan 31, 2022, 1:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details