महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dumper Hits Tehsildar Vehicle In Sangli : वाळू माफियांचा हल्ला! महिला तहसीलदाराच्या गाडीवर घातला डंपर - सांगली जिल्ह्यात महिला तहसिलदाराच्या अंगाव घातली गाडी

थेट तहसीलदार महिला अधिकाऱ्याच्या वाहनावर डंपर गाडी घालत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सांगलीच्या आटपाडी या ठिकाणी अवैध वाळू तस्करी रोखताना ही घटना घडली आहे. (Dumper Hits Tehsildar Vehicle In Sangli) सुदैवाने या घटनेत कोणीही फारसे गंभीर जखमी झाले नाही.

महिला तहसीलदाराच्या गाडीवर डंपर घातला
महिला तहसीलदाराच्या गाडीवर डंपर घातला

By

Published : Mar 15, 2022, 12:17 PM IST

सांगली -वाळू माफियांकडून थेट तहसीलदार महिला अधिकाऱ्याच्या वाहनावर डंपर गाडी घालत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सांगलीच्या आटपाडी या ठिकाणी अवैध वाळू तस्करी रोखताना ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही फारसे गंभीर जखमी झाले नाही.

वाळू तस्करांचा तहसीलदारांवर हल्ला

आटपाडी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करी कारवाई दरम्यान थेट तहसीलदारांच्या गाडीवर डंपर घालून महिला तहसील अधिकाऱ्यास ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. (Sand smugglers in sangli) वाळू माफियांकडून तहसीलदार बाई माने यांच्या गाडीवर डंपर घालण्याचा प्रकार करण्यात आला आहे. मद्रास सुदैवाने बाई माने या बालबाल बचावले आहेत. तर, इतर कोणासह या घटनेत गंभीर दुखापत झाली नाही. रात्रीच्या दरम्यान अवैध वाळू तस्करी विरोधात गस्त घालत असताना आटपाडी-मुढेरोडवर कारवाई दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

वाळू तस्करांचा तहसीलदारांना केला पाठलाग

तहसीलदार बाई माने या आपल्या शासकीय वाहनातून रात्रीच्या सुमारास तलाठी अमीर मुल्ला, कोतवाल गोरख जावीर, संजय माने यांच्या पथकासह आबानगर चौक येथे गस्त घालत होत्या. यावेळी भरधाव डंपर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तहसीलदार माने यांनी आपल्या पथकासह डंपरचा पाठलाग सुरू केला आणि काही अंतरावर मुढेवाडीकडून जाणाऱ्या आटपाडी सुतगिरणीच्या आसपास पोहचले असता, समोरून आलेल्या भरधाव गाडी क्रमांक (एम.एच 37 - बी 786)या डंपर चालकाने तहसीलदार यांच्या गाडीवरच डंपर घातला.

थेट डंपर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रसंगावधन पाहून तहसीलदार यांच्या चालकाने गाडी बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पण डंपरची जोरदार धडक तहसीलदार यांच्या गाडीला बसली ज्यामुळे तहसीलदार पुढील सिटवर असल्याने गाडीमध्ये काही काळ अडकून राहिली. दरम्यान, या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या डंपर चालकास पथकातील कोतवाल व तलाठी यांनी पकडून ताब्यात घेतले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही फारस गंभीर जखमी झाले नाही. मात्र, वाळू माफियांच्या हल्ल्याच्या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा नाही; याचिका फेटाळली

ABOUT THE AUTHOR

...view details