सांगली - शिराळा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांनी सकाळी पत्नी व आई सोबत जाऊन आपला मतदानचा हक्क बजावला. सदृढ लोकशाहीसाठी सर्वांनी घराबाहेर निघून मतदान करावे, असे आवाहन यावेळी महाडिक यांनी केले.
सम्राट महाडिक यांनी बजावला मतदानाचा हक्क - sangli voting news
शिराळा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांनी सकाळी पत्नी व आई सोबत जाऊन आपला मतदानचा हक्क बजावला. सदृढ लोकशाहीसाठी सर्वांनी घराबाहेर निघून मतदान करावे, असे आवाहन यानेळी महाडिक यांनी केले आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.