महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'भाजपने महाडिक कुटुबीयांचा विश्वासघात केला म्हणून मी अपक्ष निवडणूक लढवतोय' - samrat mahadik targets BJP

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर महाडिक यांनी शिराळा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सम्राट महाडिक म्हणाले, गेल्या निवडणुकीमध्येच शिराळा विधानसभेत भाजपचा पराभव झाला असता. परंतु, फक्त महाडिक आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमुळेच कोल्हापूरसह सांगलीतील उमेदवार निवडून आले. मात्र, आता मला पराभूत करण्यासाठी सत्यजित देशमुख आणि शिवाजीराव नाईक एकत्र आले आहेत.

सम्राट महाडिक

By

Published : Oct 12, 2019, 11:18 AM IST

Updated : Oct 12, 2019, 2:56 PM IST

सांगली -भाजपने महाडिक कुटुबीयांचा विश्वासघात केला म्हणून मी अपक्ष निवडणूक लढवत आहे, असे सम्राट महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर महाडिक यांनी शिराळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांनी भाजपकडून अर्ज भरण्याची तयारी केली होती. परंतु, विद्यमान खाजदार राजू शेट्टी, शिवाजीराव नाईक आणि भाजपच्या इतर नेत्यांनी नानासाहेब महाडिकांना भेटून नाईक यांना मंत्री पद मिळणार असल्याने आमदार करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती, असे बोलले जाते.

राहुल महाडिक

हेही वाचा -देशाचे तुकडे करणाऱ्यांना तुरुंगात पाठवणार - अमित शाह

सम्राट यांचे बंधु राहुल महाडिक हे बोलण्यासाठी उभे राहताच त्यांना वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले होते. नानासाहेब महाडिक यांच्या निधनानंतरची सम्राट व राहुल यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. सम्राट महाडिक पुढे म्हणाले की, भाजपने आत्तापर्यंत 174 लोकांना तिकीट देण्याची खोटी आश्वासने दिली आहेत. गेल्या निवडणुकीमध्येच शिराळा विधानसभेत भाजपचा पराभव झाला असता. परंतु, फक्त महाडिक आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमुळेच कोल्हापूरसह सांगलीतील उमेदवार निवडून आले. मात्र, आता मला पराभूत करण्यासाठी सत्यजित देशमुख आणि शिवाजीराव नाईक एकत्र आले आहेत.

यावेळी कलाकार संघटनेनी सम्राट महाडिक यांना जाहीर पाठिंबा दिला. तर इटकरे येथील माजी सैनिक संघटनेनेही महाडिक यांना 5000 हजार रुपयांची देणगी देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

Last Updated : Oct 12, 2019, 2:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details