महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' कोरोना बाधित कुटुंबावर गुन्हे नोंदवा,  चीन विरोधातही दाखल करा दावा - संभाजी भिडे गुरुजी - कोरोना

इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील तब्बल 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोना बाधित कुटुंबावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केली आहे.

bhide
निवेदन देताना संभाजी भिडे गुरूजी

By

Published : Mar 30, 2020, 3:39 PM IST

सांगली - इस्लामपूर येथील कोरोना बाधित कुटुंबावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केली आहे. तसेच चीनविरोधात भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा दाखल करण्याचीही मागणी भिडे गुरुजी यांनी केली आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.

संभाजी भिडे गुरुजी
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील तब्बल 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली. सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर निष्काळजीपणा करून नागरिकांचे जीव धोक्यात घातल्याने इस्लामपूर येथील "त्या" कोरोना बाधित कुटुंबावर 307 कलम राष्ट्रीय आपत्ती अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सांगली जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. तसेच हा कोरोना संसर्ग चीनमधून निर्माण होऊन आज जगभर पसरला आहे. तो भारतातही पोहोचला आहे. त्यामुळे चीनच्या या बेजबाबदार कृत्याप्रकरणी भारत सरकारने चीनविरोधात आंतराष्ट्रीय न्यायालयात दावा दाखल करावा, अशी मागणीही भिडे गुरुजी यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details