सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात झाला आहे. सायकलवरून जात असताना चक्कर येऊन भिडे हे खाली (Sambhaji Bhide fell from Bicycle) पडले. त्यामुळे त्यांच्या खुब्याला मार लागला (Sambhaji Bhide injured) आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संभाजी भिडे हे त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
सायकलवरून पडले -बुधवारी (27 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा अपघात झाला आहे. नेहमीप्रमाणे संभाजी भिडे हे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी सायकलवरून गेले होते. दर्शन झाल्यानंतर परतत असताना गणपती मंदिर परिसरात अचानकपणे भिडे यांना चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडले. हा प्रकार आजूबाजुच्या लोकांना लगेच लक्षात आला. त्यांनी भिडे यांना तत्काळ उचलून बाजूला बसवले. काही वेळात भिडे गुरुजी हे शुद्धीवर आले. मात्र, या घटनेत त्यांच्या खुब्याला मुक्का मार लागला आहे.