सांगली - अखंड हिंदुस्थान ( Sambhaji Bhide on Akhand Hindustan ) आणि देशाला ताकद द्यायची असेल, तर हिंदुस्थानच्या 123 कोटी लोकांचा रक्त गट बदलला ( Sambhaji Bhide on Indian people blood group ) पाहिजे आणि तो रक्तगट छत्रपती शिवाजी - संभाजीचे ( Sambhaji Bhide on Shivaji Maharaj in Sangli ) केले पाहिजे, असे विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. त्याचबरोबर देशाला म्लेंच्छ, अँग्लो आणि गांधी बाधा झाल्याची टीकाही भिडे यांनी केली. मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ( Sambhaji Bhide news sangli ) ते बोलत होते.
हेही वाचा -महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यात तरुणाची आत्महत्या
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण -मिरज शहरातल्या शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आणि स्मारकाचे मिरजेचे नगरसेवक निरंजन आवटी यांच्या पुढाकाराने सुशोभीकरण झाले आहे. याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी 26 एप्रिल रोजी पार पडला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांच्यासह भाजपा नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.